म्हैसुरचे खासदार मा.प्रतापजी सिम्हा यांचे हस्ते कृष्णा बँकेचे जमाले पाटील सन्मानित..!!
================================
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील कृष्णा अर्बन को.ऑ.लि.केज या बँकेचा व्यवहार व ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या त्यांच्या हिताच्या विविध योजना खुप चांगल्याप्रकारे दिल्याने बँकेत ठेवीदारांच्या वाढलेल्या ठेवीची रक्कम त्याचा चढता आलेख लक्षात घेऊन २०२१ मधील
५० कोटी ते ७५ कोटी ठेवी श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल असुन याबद्दल बँकेला प्रथम पारीतोषीक म्हैसुरचे खासदार मा.प्रतापजी सिम्हा यांचे हस्ते बँकेचे प्रतिनिधी जमाले पाटील (दादा) यांना नुकताच देण्यात आला. या बात अधिक माहिती अशी की सर्वोपरिचित असणारे राजकीय पटलावर ज्यांचा दबदबा आहे.
ते म्हणजे विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक संस्था , कॉलेज , शाळा , बँका अशा व्यवसायात नावलौकिक मिळवलेले मा.विक्रम (बप्पा) मुंडे यांनी शैक्षणिक ,राजकीय व आर्थिक समिकरण योग्य पध्दतीने जुळवल्याने त्यांनी कृष्णा अर्बन को.ऑ.लि.केज या बँकेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा बँकेचे चेअरमन व विडा जि.प.गटाचे लोकप्रिय सदस्य.मा. श्री.विजयकांत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली देवगाचे सरपंच मा.श्री.अतुल (दादा) मुंडे यांच्या नियंत्रणाखाली कृष्णा अर्बन को-ऑप. बँक लि. केज. या बँकेने अल्पावधीतच उत्कृष्ट कार्य करून गरुड झेप घेतली आहे. व जनतेचा विश्वास संपादन केल्याने बँकेतील ठेवीदारांचे संख्या वाढले आहे.
त्यामुळे कृष्णा अर्बन को-ऑप बँक पुरस्कारासाठी पात्र ठरल्याने बँको पब्लिकेशन व सीमा गॅलेक्सी कोल्हापूर, यांच्या वतीने दिला जाणारा ५० ते १०० कोटींच्या श्रेणीत प्रथम पारितोषिक मिळाले असून त्याचे वितरण नुकतेच म्हैसूर येथे करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा म्हैसूर येथील मैसूरचे खासदार मा.श्री.प्रतापजी सिम्हा यांच्या हस्ते कृष्णा बँकेचे प्रतिनिधी दादा जमाले पाटील व बापू शेवाळे यांना देण्यात आला.
या उत्कृष्ट कार्याबद्दल बँकेचे निर्माते माननीय श्री विक्रम बाप्पा मुंडे यांचेसह बँकेचे चेअरमन विजयकांत मुंडे देवगाव चे सरपंच अतुल (दादा) मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव मुंडे आणि बँकेचे शाखा व्यवस्थापक, रोखपाल व त्यांचे सर्व सहकारी ग्राहक तसेच ठेवीदार यांचे अभिनंदन होत आहे.

