shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🕉️ आजचे पंचांग दिनांक २/९/२०२१

*गुरुवार, सप्टेंबर २, २०२१
*युगाब्द : ५१२३
*भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक भाद्रपद ११ , शके १९४३
*सूर्योदय : ०६:२४
*सूर्यास्त : १८:५२
*चंद्रोदय : ०२:४१, सप्टेंबर ०३ चंद्रास्त : १५:३४
*शक सम्वत : १९४३ प्लव
*चंद्र माह : श्रावण
*पक्ष : कृष्ण पक्ष
*तिथि ; एकादशी - पूर्ण रात्रि पर्यंत
*नक्षत्र : आर्द्रा - १४:५७ पर्यंत
*योग : सिद्धि - १०:१० पर्यंत
*करण : बव - १९:०७ पर्यंत
*द्वितीय करण : बालव - पूर्ण रात्रि पर्यंत
*सूर्य राशि : सिंह
*चंद्र राशि : मिथुन
*राहुकाल : १४:१२ ते १५:४५
*गुलिक काल : ०९:३१ ते ११:०४
*यमगण्ड : ०६:२४ ते ०७:५७
*अभिजितमुहूर्त : १२:१३ ते १३:०३
*दुर्मुहूर्त : १०:३३ ते ११:२३
*दुर्मुहूर्त : १५:३३ ते १६:२३
*वर्ज्य : ०३:५०, सप्टेंबर ०३ ते ०५:३३, सप्टेंबर ०३

*हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात.
ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.नाराळातीला सुख्या खोबर्याला गोटा खोबरे म्हणतात.  या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.

आज आंतरराष्ट्रीय नारळ दिन आहे

मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक - शब्द प्रभुत्व,  कल्पनावैभव,  कोटी बाजपणा, वास्तववादी,  व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार लेखक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स.  खांडेकर.  वि स खांडेकर यांचा जन्म सांगली येथे. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ सखाराम  रामचंद्र खांडेकर यांनी त्यांना दत्तक घेतले.  पुढे वि. स.  खांडेकर या नावाने ते ओळखले जाऊ लागले.  मॅट्रिकची परीक्षा खांडेकर आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते."परीक्षेत चांगले यश लाभल्यामुळे मामांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.  परंतु परिस्थिती अभावी त्यांना शिक्षण इंटरच्या वर्गातच दुर्दैवाने सोडून द्यावे लागले.  या काळात त्यांचा परिचय बालकवी, गणपतराव बोडस,  अच्युतराव कोल्हटकर , का. र.  मित्र इत्यादी साहित्यिकांशी झाला आणि त्यांच्या लेखनाची सुरुवात याच काळात झाली."
रमणीरत्न “ हे त्यांचे पहिले नाटक त्यांनी लिहून पूर्ण केले.  कॉलेज सोडल्यानंतर ते सावंतवाडीला आपल्या बहिणीकडे राहू लागले. खांडेकरांचे लेखन १९१९ पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ ह्या टोपण नावाने कविता व ‘आदर्श’ ह्या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले.  कादंबरी,  काव्य,  लेख , विनोदी साहित्य असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध होऊ लागले.  पुढे शिरोड्याच्या इंग्लिश हायस्कूल मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली पुढे ते लवकरच मुख्याध्यापक झाले.  त्यांचा हा लेखक म्हणून उमेदीचा काळ होता.  १९३८ नंतर ते कोल्हापूरला जाऊन स्थायिक झाले. हृदयाची  हाक,  कांचन मृग , दोन ध्रुव ,  उल्का,  दोन मने,  हिरवा चाफा , रिकामा देव्हारा,  पांढरेढग, पहिले प्रेम,  जळलेला मोहर,  ययाती,  अमृतवेल इत्यादि त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. याशिवाय वायुलहरी, , चांदण्या,  सायंकाळ , अविनाश मंदाकिनी इत्यादी  कथासंग्रह  तर  वनभोजन,  दुर्वास फुल आणि काटे,  गोकर्णीची फुले , गोफ आणि  गोफण  हे लेख,  आगरकर, गडकरी यांचे चरित्र वांग्मय प्रसिद्ध झाले.  ज्वाला,  देवता, ,  सुखाचा शोध, माझं बाळ,  लग्न पहावे करून,  सरकारी पाहुणा चित्रपटांच्या कथा संवाद आणि त्यांनी लिहिले होते.  खांडेकरांचे विनोदी वैशिष्ट्यपूर्ण होते तर रूपक कथा ही खांडेकरांनी मराठीला दिलेली मोठी देणगी होय.  त्यांच्या लेखनाच्या अनेक भाषांत अनुवाद झाले.
*खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत.
*१९६१ मध्ये त्यांच्या ययाति  ह्या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. ह्या कादंबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. ह्या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते. १९७४ साली “ज्ञानपीठ” पुरस्काराने त्यांच्या साहित्य सेवेचा  गौरव करण्यात आला तर १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला.
• १९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म : १९ जानेवारी, १८९८)

*बहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीकार साहित्यिक, नामवंत प्राध्यापक, अस्पृश्यताविरोधी कार्य करणारे कृतिशील, निष्ठावंत समाजसेवक. प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे . यांचा  जन्म विदर्भातील शिरपूर ह्या गावी. शिक्षण सातारा व पुणे येथे एम्, ए. पर्यंत. त्यांच्या विद्यार्थिजीवनात रँग्लर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, गो. चिं. भाटे, पां. दा. गुणे, सीतारामपंत देवधर ह्यांसारख्या थोर अध्यापकांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले. लोकमान्य टिळक, थोर संस्कृत पंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर ह्यांच्या जीवनांचाही प्रभाव माटे ह्यांच्यावर पडला. सातारा (न्यू इंग्लिश स्कूल) आणि पुणे (न्यू इंग्लिश स्कूल नूतन मराठी विद्यालय) येथील शाळांतून अध्ययन केल्यानंतर १९३५–४६ ह्या कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलदायी झाली.*
*माटे ह्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात त्यांनी केसरीप्रबोध (१९३१) ह्यां ग्रंथाचे एक संपादक म्हणून परिश्रमपूर्वक काम केले.केसरीने केलेल्या बहुविध कामगिरीचा परामर्श निरनिराळ्या लेखकांनी ह्या ग्रंथात घेतलेला आहे. माटे ह्यांनी ह्या ग्रंथासाठी लेखनही केले. महाराष्ट्र सांवत्सरिक (३ खंड, १९३३–३५) हा माटे ह्यांनी संपादिलेला आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. विविध सावत्सरिकांचा काळजीपूर्वक अभ्यास करून माटे ह्यांनी महाराष्ट्र सांवत्सरिकाचा आराखडा तयार केला.इंग्रजी सांवत्सरिकाचे केवळ अंधानुकरण न करता, मराठी वाचकांच्या अपेक्षा आणि गरजा विचारात घेतल्या. रोहिणी ह्या मासिकाचे माटे हे पहिले संपादक. शास्त्रीय ज्ञानाचे आणि विज्ञानप्रसाराचे महत्त्व जाणून त्यांनी विज्ञानबोध संपादिला, त्याला सु. दोनशे पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना लिहिली.

उपेक्षितांचे अंतरंग (१९४१), अनामिका (१९४६), माणुसकीचा गहिंवर (१९४९), भावनांचे पाझर (१९५४) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध असून महारमांग, रामोशी, कातवडी इ. उपेक्षित जमातींतील व्यक्तींचे, त्यांच्या सुखदुःखांचे त्यांच्या जीवनरीतींचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यांनी त्यांत सह्रदयतेने केले आहे.* *‘कृष्णाकांठचा रामवंशी’, ‘तारळखोऱ्यातील पिऱ्या’, ‘नाथनाक आणि देवकाई ह्यांची काळझोप’ आणि ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्यांसारख्या त्यांच्या कथा आजही अविस्मरणीय वाटतात. पश्चिमेचा वारा (१९५६) ही त्यांची एकमेव कादंबरी.  साहित्यधारा (१९४३), विचारशलाका (१९५०), विचारमंथन (१९६२) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय होत. विविध नियतकालिकांतूनही त्यांनी विपुल लेखन केले.

*आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित व स्वतंत्र ठेवून मराठी वाङ्मयावर एक चिरंतन मुद्रा उमटविणाऱ्या थोर ज्ञानोपासकांत माटे ह्यांची गणना केली जाते. पुणे येथे ते निधन पावले.*
*१८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू : २५ डिसेंबर, १९५७)*

घटना :
*१९१६ : पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.*
*१९२० : म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.*
*१९३९ : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.*
*१९४५ : व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.*
*१९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.*
*१९६० : केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.*
*१९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.*

*• मृत्यू :*
*• १९६० : वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.*
*• १९९० : मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म : ३ ऑक्टोबर १९०७)*
*• १९९९ : चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म : १७ डिसेंबर* *१९११ – पाचल, राजापूर, रत्‍नागिरी )*
*• २००९ : आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी याचं विमान अपघातात निधन. (जन्म : ८ जुलै १९४९)*
*• २०११ : संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन. (जन्म : ३० एप्रिल १९२६)*
*• २०१४ : भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म : ७ मे १९४९)*

*जन्म :*
*१८३८ :  भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू : २३ जुन १९१४)*
*१९४१ : चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.*
*१९६५ : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.*
*१९७१ : भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.*
*१९८८ : भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्
*माहितीस्तव: लोकसेवा विकास आघाडी, श्रीरामपूर.
close