------------------------------------------
कास्ट्राईब शिक्षक संघटना ,शिक्षक सेना,न पा.मनपा शिक्षक संघटना ,शिक्षककेतर कर्मचारी संघटना ,रायझिंग ट्राईबल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मा.लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेबांना शिक्षकांच्या वतीने कोवीड योध्दा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच.मा.आमदार निलेशजी लंके साहेबांनी कोवीड काळात अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहे.आमदार साहेबांच्या कार्याची दखल जगभरातुन घेतली गेली.तसेच आमदार साहेबांच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी देखील पुढाकार घेऊन प्रश्न सोडवण्यात आले आहे.,जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या भावना होत्या की आमदार साहेबांचा शिक्षकांच्या वतीने सन्मान करावा.या प्रसंगी सन्मानपत्र बुके देऊन निलेशजी लंके साहेबांचा सत्कार करण्यात आला.या वेळी या कार्यक्रमाचे आयोजक प्रसाद शिंदे यांनी माहिती दिली की
या पुढील काळात कास्ट्राईब शिक्षक संघटना ,शिक्षक सेना,न पा.मनपा शिक्षक संघटना ,रायझिंग ट्राईबल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,जिल्हा समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड काळत उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक तसेच नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे.
या प्रसांगी जिल्हाभरातुन शिक्षक उपस्थित होते. *पारुनाथ ढोकळे ,सुभाष येवले ,समिर पठाण ,अरुण पवार ,अंबादास शिंदे ,जनार्धन पांडूळे सर ,ललित वाकचौरे , सुरज घाटविसावे , प्रसाद शिंदे बाबासाहेब गवते,सुनिल अंगारखे, सचिन गायकवाड इतर मान्यवर उपस्थित होते*.


