इंदापूर तालुक्यातील आदर्श पिता , राजकीय व सहकार क्षेत्रातील अभ्यासू अनुभवी आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे लालासाहेब पवार.
कारखान्याचे चेअरमन , सरपंच, सोसायटी चेअरमन , कारखान्याचे संचालक, पंचायत समिती सदस्य आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी करणारे व आदर्श पिता म्हणजेच लालासाहेब पवार यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: (९ सप्टेंबर २०२१) इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन लालासाहेब देविदास पवार यांचा ६४ वा अभिष्टचिंतन त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.
शिरसटवाडी गावचे शेतकरी कुटुंबातील दिवंगत देविदास पवार व आई अनुसया पवार यांचे सुपुत्र म्हणजे लालासाहेब पवार होय.
लहानपणापासून आईवडिलांच्या आणि भाऊ यांच्या प्रेमाने वाढलेले घरातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व. वडील शाळा शिकू शकले नाही म्हणून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी लालासाहेब पवार यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसटवाडी. रयत माध्यमिक विद्यालय शेळगाव येथे माध्यमिक शिक्षण तर कॉलेज जीवनातील शिक्षण तुळजाराम कॉलेज बारामती या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले.
या काळातच त्यांनी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व स्वीकारून कार्यरत राहिले .पुढे ते गावातील राजकारणात सक्रिय होत. तीन वेळा सरपंच पद भूषवले आणि शिरसटवाडी गावच्या विकासामध्ये विविध माध्यमातून भर घातली. आपल्या कार्याचा ठसा उमटवत शंकरराव पाटील(भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असतानाच कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखानाचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील कार्य करीत राहिले .पुढे ते पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले .तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते नऊ वर्ष प्रथम संचालक म्हणून कार्यरत होते .यानंतर गेली सात वर्षापासून निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून भाजप नेते व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू व अनुभवी चेअरमन म्हणून ते कार्यरत आहेत.
विश्वास स्वभाव आणि नेतृत्व सिद्धता याचा मिलाफ असलेले चेअरमन लालासाहेब पवार आज इंदापूर तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व देशात हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नीरा भीमा साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पाच्या यशस्वीतून नावलौकिक मिळवत आहेत .यामध्ये नीरा-भीमा कारखान्याचे संचालक मंडळ यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचा कारखाना अनेक आव्हानांना तोंड देत नावारूपाला आणताना दिसत आहे.
लालासाहेब पवार यांच्या राजकीय कारकीर्दी बरोबर त्यांच्या परिवारातील त्यांचा मुलगा विनोद पवार प्रशासकीय सेवेत सहाय्यक इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या मुली रोहिणी पवार या डॉक्टर आहेत. प्रियंका पवार डेप्युटी कलेक्टर आहेत. व मोहिनी पवार सेल टॅक्स इंस्पेक्टर आहेत. अशा लाखमोलाच्या मुलांची जडणघडण करणारे तालुक्यातील आदर्श व मार्गदर्शक म्हणून ज्यांची ओळख सर्वदूर आहे असे लालासाहेब पवार एकमेव आदर्श पिता आहेत. पवार यांचे जावई हे सुद्धा राज्यातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. अशा संस्कारमय परिवारातील पवार हे इंदापूर तालुक्यातील एक आदर्श सरपंच, सोसायटीचे चेअरमन, पंचायत समितीचे सदस्य, साखर कारखान्याचे संचालक, आणि आदर्श पिता आदर्शवत जीवन स्वीकारलेले लालासाहेब पवार यांना ६४ व्या अभिष्टचिंतन दिन यानिमित्त त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.

