शांत ,संयमी आणि जबाबदार व्यक्तिमत्व असलेले झगडेवाडीचे अतुल झगडे यांच्या ३८ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: (९ सप्टेंबर २०२१)झगडेवाडी या गावचे सुपुत्र, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुका कार्याध्यक्ष आणि कुशाग्र बुद्धिमत्ता आणि शांत संयमी नेतृत्व असलेले अतुल गौतम झगडे यांचा ३८ वा अभिष्टचिंतन दिन यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.
अतुल गौतम झगडे यांचा जन्म ९ सप्टेंबर १९८३ रोजी झाला असून सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील दिवंगत गौतम झगडे झगडेवाडी यांचे ते सुपुत्र आहेत. श्रीमती सुनंदा झगडे त्यांची आई यांचे शिक्षण इयत्ता नववी, वडिलांचे इयत्ता नववी पर्यंत शिक्षण झाले असल्याने अतुल झगडे यांना शिक्षण क्षेत्रात भरीव असे शिक्षण घेता आले व त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्कर आणि कृषी डिप्लोमा या पद्धतीचे शिक्षण घेत सामाजिक, राजकीय व कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे.
लहानपणापासून मित्रांसमवेत सामाजिक कार्याची आवड असलेले अतुल झगडे यांचा मित्रपरिवार ही व्यापक स्वरूपात आहे. त्यांच्या शांत संयमी कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी शेती, व्यवसाय यामध्ये भरीव अशी प्रगती केली आहे. तसेच त्यांनी झगडेवाडी ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी रूपालीताई झगडे यांना सरपंच पदावर ती विराजमान करून झगडेवाडी ग्रामपंचायत च्या विकास कामांमध्ये बरीच अशी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या पत्नीस आदर्श सरपंच पुरस्कारही जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
अतुल झगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी युवक मित्र यांच्या बरोबर स्नेहबंध ठेवत ते इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत आहेत.
तसेच ते इंदापूर तालुका विद्युत वितरण कंपनी च्या शासकीय कमिटीचे तालुका अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळत आहेत. सर्वधर्मसमभावना जोपासत सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने त्यांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.
अशा सामाजिक राजकीय कार्यकुशल जबाबदार नेतृत्व असलेले अतुल झगडे त्यांच्या ३८ व्या अभिष्टचिंतन दिन आज असून त्यांना त्यांच्या चाहत्यांच्या माध्यमातून विविध स्वरूपात शुभेच्छा मिळत आहेत.


