पिंपरी-चिंचवड : पुण्याजवळील पिंपरी गाव येथील पशु पालक गणेश कापसे व ज्ञानेश्वर कापसे ह्यांच्या गावरान गाईला दुतोंडी वासरू झाले असून हे वासरु पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड मधील नागरीकांनी कुतूहलाने मोठी गर्दी केली आहे. असे अजब व दुर्मिळ वासरु पाहुन नागरिक अचंबीत झाले आहेत.
शनिवार दि १८/०९/२०२१ रोजी जन्मलेले नर जातीचे वासरु हे दुतोंडी असुन त्यास चार कान, चार डोळे असुन त्या वासराचे एक तोंड व्यवस्थितरीत्या पुर्ण कार्यान्वित असुन दुस-या तोंडाच्या खालील जबड्याची वाढ न झाल्याने त्या तोंडाने दुध पिता येत नाही.
वासरास दोन्ही तोंडांचा भार झेपत नसल्याने त्यास व्यवस्थित उभे राहता येत नाही. पशुवैद्यांनी तपासणी केली असुन गाई व वासरु ठिक असुन अशा प्रकारचे वासरु जनुकीय बदलामुळे होऊ शकते, असे पशु वैद्यांनी सांगितले आहे.

