shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वस्त साईबाबा संस्थान ..! साईबाबांचे विचार आता तरी जपाल का..?


कोपरगाव :
सन २०१२ ला मा. उच्च  न्यायालयाने साईबाबा संस्थानचे राजकिय विश्वस्त नेमणूकी बाबत खेद व्यक्त केला होता..!


राज्य शासन वारंवार राजकिय नेत्यांचे पुनर्वसन करीतच आहे.. हे जनतेला वारंवार खटकते.. हिन्दू देवस्थान राजकिय पक्ष आनंदाने वाटून घेतात... आणि भ्रष्टाचार प्रचंड बोकाळतो..!
भक्ताने केलेले दान मनमुराद पणे मतदार संघ विकासा साठी वापरले जातात.. शासन सुध्दा अधून मधून डल्ला मारत असते.. 
*माझे साईबाबा संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्तांना आवाहन आहे.. श्री साईबाबांच्या दरबारात येण्या पुर्वी किमान  बाबांच्या आकरा वचनांना मुखोदत करा.. साईबाबांच्या काकड आरती,मध्यान्ह आरती , धुपारती व शेजारती पाठ करा..*
आपली परिक्षा आम्ही साईभक्त कधीही घेऊ शकतो..

संजय भास्करराव काळे
close