shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणपती देखाव्यातून साईबाबांच्या शिकवणुकीचा पर्यावरणाचा मंत्र..!!

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव संकल्पनेला सार्थ ठरेल असा गणपती देखाव्यातून साईबाबांची पर्यावरणाचे विकास व संवर्धनाची शिकवणूक देणारा देखावा शिर्डीतील मयुर चोळके या तरुणाने साकारला आहे. 

घरगुती स्वरूपात पर्यावरण पूरक तुरटीचा गणपती बसवून सोबत अगदी कमी जागेत साईबाबांच्या वृक्षारोपणाचा संदेश सोबत साईबाबांच्या द्वारकामाई समोर साईबाबा वृक्षांना पाणी टाकतानी आणि तसेच या शिकवणी वर काम करणारी ग्रीन ऍड क्लीन शिर्डी फाउंडेशन चे सर्व सक्रिय सदस्य ३५ ते ४० सदस्यांचे छोटे पुतळे वृक्षारोपण करताना अगदी मजेशीर रीत्या प्रत्येक सदस्याचे चेहऱ्यांचा मुखवटा देऊन प्रतीकात्मक वृक्ष लागवड संवर्धन करतानाचा देखावा साकारलेला आहे. 

त्याचबरोबर याच देखाव्यात या फाउंडेशन ने हाती घेतलेले अनेक कामे हे छायाचित्र स्वरूपात कोलाज काम करून साई मंदिराचा कळस द्वारकामाई, परिक्रमा मार्ग व कोविड योद्ध्यांना सलामी देणारा, लसीकरणाचे महत्त्व सांगणारा, कोरोनाशी लढण्यासाठीच्या उपाययोजनांचा देखील समावेश केलेला आहे. सोबतच या देखाव्यातून ग्रीन ऍड क्लीन सदस्यांचा कौटुंबिकत्व ही प्रकर्षाने दाखवतानाचा देखावा दिसून येतो. याच देखाव्याचा निमित्ताने या देखावे चे उद्घाटन तुलसी पूजन करून शिर्डी शहराचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, साई समर्थ पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम गोंदकर, कमलाकर  कोते, ग्रीन अँड क्लीनचे डॉ. जितेंद्र शेळके, अजित पारख, डॉ. धनंजय जगताप, ॲड अनिल शेजवळ, प्रा.रघुनाथ गोंदकर, सौ. रजनीताई गोंदकर, कु. स्मिता पवार, मणीलाल पटेल, प्रसाद वेद, डॉ. दीपक जानी, दादासाहेब काळे, संजय त्रिभुवन, संतोष मेहेर, सागर वाल्हेकर, विनोद गोंदकर, चेतन कोते, अक्षय गोंदकर, राहुल ठुबे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या देखाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.


यावेळी शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी मयूरच्या कल्पकतेचे व देखाव्यातील बारकावे यांची प्रशंसा करत कौतुक केले तर नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी शिर्डीतील तरुण वर्ग व नागरिक जागरूक होत असल्याचे समाधान व्यक्त करत भविष्यासाठी मयूर लाख शुभेच्छा दिल्या तसेच सचिन तांबे व कमलाकर कोते यांनीही आगळ्यावेगळ्या देखाव्याचे कौतुक करत सर्व मान्यवरांनी मिळून मयूर सत्कार याचा सत्कार करत मयूरला भविष्यातील कल्पक योजनांना शुभेच्छा दिल्या.
close