shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंदी ही एक शक्तिशाली व अद्भुत भाषा आहे. -डॉ. संध्या खेडेकर

संगमनेर प्रतिनिधी- भाषेचा प्रचार प्रसार करून जतन संवर्धना बरोबरच आदर केला पाहिजे. भाषा म्हणून  विषयाचा अभ्यास केला पाहिजे. प्रेमचंद, कबीर, हरिवंशराय बच्चन, मैथिलीशरण गुप्ता आणि इतर  हिंदी लेखकांनी हिंदी भाषेची उंची वाढवली परंतु हिंदी भाषिकांनी तिला टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.  हिंदी ही अलंकृत भाषा असल्याने एक अद्भुत आणि शक्तिशाली भाषा आहे. जगाच्या तुलनेत  चौथ्या क्रमांकाने बोलली जाणारी भाषा म्हणून तिचा गौरव केला जातो. हिंदी लेखकांनी हिंदी भाषेला मोठा सन्मान दिला आहे. असे मत अध्यक्षा प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी हिंदी दिनानिमित्त व्यक्त केले.  गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. खेडेकर बोलत होत्या. खेडेकर पुढे म्हणाल्या की, हिंदी भाषा इमानदारी शिकवते,  हिंदी ही एक अद्भुत भाषा आहे. जसे लिहितो, तसे वाचतो. त्याच प्रकारे सुंदरता आणि सौंदर्य हिंदीचा एक महत्त्वाचा भाग आहे, हिंदी एकमेकांना जोडते असे प्राचार्या डॉ.संध्या खेडेकर म्हणाल्या. 





प्रमुख अतिथी प्राचार्या डॉ. सुदर्शन डंग म्हणाल्या की, भारत हा एक विशाल देश आहे .

समृद्धीने नटलेल्या या देशात विविध भाषा बोलल्या जातात. त्यातील  हिंदी भाषा ही आपल्या देशाची ओळख आहे.  हिंदी भाषेचा आम्हाला अभिमान आहे, हिंदी भाषेने अखंड भारत जोडला आहे. लढा, स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका बजावून हिंदी लोकप्रिय झाली आहे.   त्या म्हणाल्या हिंदी भाषा चेतना आहे.  जगाच्या मुख्य भाषेत हिंदीचा समावेश आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.  हिंदी सक्षम आहे, तिच्या प्रसाराला आणि प्रचाराला प्रोत्साहन दिले पाहिजे.  असे डॉ. डंग म्हणाल्या. डॉ.जी. पी. शेख यांनी हिंदी भाषा ही आपणास एक वरदान आहे, हा समाजाचा धर्म आहे. २१ व्या शतकात भाषा बदलत आहेत.  जवाहरलाल नेहरू उर्दू संस्थेचे अध्यक्ष ईदरीस शेख म्हणाले की, हिंदी भाषेचा संदेश पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणपर्यंत नेऊन आवाका वाढला आहे. 

हिंदी मोहीम चालवली पाहिजे. 14 सप्टेंबर हा आनंदाचा दिवस असल्याने जगामध्ये

हिंदी कायम प्रकाश झोतात  राहिली पाहिजे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सय्यद आसिफ अली, शानू बेगमपुरे, प्रा.  सुनील देसले, प्रा.  अमोल चावंडे, रवी दुर्गूडे, सुनील लव्हाळे, रमेश पिंगळे, दत्ता ढेपळे, भारत रेघाटे आदि उपस्थित होते.

डॉ.बाळासाहेब मुरादे  प्रास्ताविक केले, सूत्र संचलन प्रा.सतीश घाडगे यांनी तर आभार प्रा.अर्जुन पिठे यांनी मानले. जवाहरलाल उर्दु संस्थेच्या वतीने संस्थेला बोर्ड भेट दिला तर गोखले एज्युकेशन सोसायटी शिक्षणशास्त्र विभागाच्या वतीने मान्यवरांना पुस्तके भेट देण्यात आली.

close