shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवा; राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा तालुका प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर: बुधवार दिनांक २९ सप्टेंबर.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी घेतली. 
    जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी
 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. या यात्रे निमित्त जयंत पाटील यांनी आज अहमदनगर शहर, पारनेर व श्रीगोंदे येथे पक्ष बांधणी कामाचा आढावा बैठका घेतल्या.
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत  शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न..!!
       विधानसभा निवडणुकीत आपण 54 नाही तर 90-100 जागा जिंकू शकतो, मात्र यासाठी आपल्याला संघटना बांधणीवर भर द्यावा लागेल. आपण सत्तेत आहे म्हणून पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रवादीच्या 16 ही सेलने पूर्ण क्षमतेने काम करणे आवश्यक आहे. जनसामान्यांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे

त्या सोडविणे याला प्राधान्या द्या, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या.पाटील पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांना साथ दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील 12 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने पटकावल्या. मात्र आपल्याला ही संख्या द्विगुणीत करायची आहे.

     मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले, मात्र आगामी निवडणुकीत आपला व आपल्या उमेदवाराचा जनसंपर्क वाढवा. याच जनसंपर्काचा उपयोग करून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आपल्याला वाढवायची आहे. पुढील वेळी लोकसभेतही पक्षाला उत्तम यश मिळावे यादृष्टीने काम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाला राष्ट्रवादीने लक्ष केले असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे टेन्शन वाढले आहे.
          
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली.या प्रसंगी  आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, चंद्रशेखर घुले पाटील, दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, राहुल जगताप, प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, अविनाश आदिक,  प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, प्रदेश चिटणीस अंबादास गारूडकर, राजेंद्र कोठारी, अहमदनगर जिल्हा निरीक्षक अंकुशराव काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिवले, अहमदनगर जिल्हा युवक निरीक्षक किशोर मासाळ, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, युवती जिल्हाध्यक्षा राजराजेश्वरी कोठावळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गालिब साबीर अली सय्यद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, वकील सेल जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश शिंदे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सुभाषराव लोंढे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे ( तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

close