शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी,दि.२९ ,सप्टेंबर,(प्रतिनिधी) – १९ व्या शतकातला अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारा पिंपळगाव माळवी तलाव ब्रिटिशांनी तयार केला होता. या तळ्यावरील भरुन वाहणारे पाणी अहमदनगर – वांबोरी या रस्त्यावर असलेल्या दगडी पुलावरून जाते आहे. पूर्वी हा दगडी फरशीचा पुल रस्ता खूप चांगल्या स्थितीत होता. पुलाच्या दुरुस्तीत जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. या पुलाची तातडीने उंची वाढवत दुरुस्त करावा अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासण्याचा इशारा सावता महाराज युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी दिला आहेे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नगर – वांबोरी रस्त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी वाढली आहे. डोंगरगण हे तीर्थक्षेत्र या रस्त्यावर असल्याने तसेच येथील घाट हा निसर्गसौंदर्याने नटला असल्याने भाविक व निसर्गप्रेमींची रेलचेल या रस्त्यावर आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने येथे काटेरी झाडे व फरशी पेक्षा मातीचा थर वर आलेला आहे. दोन्ही बाजूने ५ फुट रूंद व २ फुट खोल व पुर्ण लांब चर खोदुन पाणी जाण्यासाठी जागा करून दिली तसेच प्रामाणिकपणे वरचेवर डागडुजी केली तर सर्व समस्या दुर होतील.
रस्त्यावर पाणी थांबणे बऱ्यापैकी कमी होईल व प्रवाशांना ये जा करता येईल. तसेच फरशीच्या गार्ड स्टोन अर्थात नंबरे जवळील झाडे झुडपे काढून टाकल्यास त्या फरशीच आयुष्य वाढेल. सध्या पुलाची अतिशय दुरवस्था झाली असून निर्मिती झाल्यापासून आज पर्यंत त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली नाही. आज या पुलाची स्थिती अतिशय दयनीय झाली असून हा पूल रहदारीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे. तसेच पिंपळगाव तलावाच्या ओव्हरफ्लोचे पाणी या पुलावरून जाते. त्यामुळे पुलावर गार्ड स्टोन च्या बरोबरीने पाणी असते. यामुळे या पुलाच्या डागडुजी करून पाण्याचा प्रवाह पुलाखालून करून द्यावा. अथवा निर्माण झालेले खड्डे तातडीने दुरुस्त करा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला काळे फासणार असल्याचा इशारा संत सावता माळी युवक संघाच्या वतीने अशोक तुपे यांनी दिला आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

