shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रा. काँ. शहराध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्त्या शितल लांडगे यांची निवड..!!



प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
 बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे व महिला जिल्हाध्यक्षा संगीता ताई तुपसागर, केज तालुका अध्यक्षा संजीवनीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुका कार्यकारिणीची  निवड करण्यात आली आहे.

 

केज शहराध्यक्ष म्हणून केज शहरातील क्रांतीनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या  शितल महादेव लाडंगे यांची रा.काँ. महीला श.अ. पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
  यावेळी  सर्व पदाधिकारी व महिलामंडळ उपस्थित होत्या. महिलांच्या विविध प्रश्र्नावर शितल लाडंगे यांनी आवाज उठवला आहे. तसेच बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी क्रांती नगर भागातील अनेक गरजवंत महिलांना आधार देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. मागास प्रवर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. या त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष पदी शितल लाडंगे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
close