प्रतिनिधी : रफीक शेख
नारायणडोहो : ३० / नगर तालुक्यातील नारायणडोहो येथील नारायणडोहो ते पारगाव फाटा या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असुन लोकप्रतिनिधिंनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करूनही रस्ता न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .त्याचबरोबर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचे साधन शेती असल्यामुळे मोठी कसरत करत या रस्त्यावरून त्यांना दररोज ये-जा करावी लागत आहे.
पावसाळ्यात चिखलामुळे छोटे मोठे अपघात होतात.
प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत, त्यामुळे हा रस्ता कधी दुरूस्त होतो? यांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तसेच लोकप्रतिनिधी, पुढारी,नेते, याबाबत काय कारवाही करणार की फक्त *तेरी भी चूप मेरी भी चुप* अशीच अवस्था या रस्त्याबाबत नागरीकांना पाहायला मिळत आहे.
याबाबत नारायणडोहो ग्रामपंचायतीमध्ये अनेकदा ठराव करण्यात आले,माञ याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली, कोणत्याही प्रकारची दखल लोकप्रतिनिधी कडून घेतली जात नसल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे.
पारगाव फाटा ते नारायणडोहो गावापर्यंतचा रस्ता गेल्या पंधरा वर्षां पासून अक्षरशः चाळण झाली आहे.मोठ मोठे खड्डे पडले आहेत व चिखलामुळे गाडी घसरून पडत आहे. या रस्त्यावर नगर-सोलापूर रस्ता कडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.याकडे गावातील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती नगर व प्रशासनाने लक्ष द्यावे. आम्ही पदर खर्च करून मुरुम टाकतो. हा रस्ता तातडीने डांबरीकरण व्हावा अशी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे.

