सांगली दि. २६: सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. सुरेश भिसे यांची तर सचिवपदी प्रा दिलीप जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी सदरच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.या बैठकीस उपाध्यक्ष प्रा. धनपाल यादव, प्रा. पी. व्ही.जाधव, सहसचिव प्रा. भिलवडे व्ही. बी .प्रा. बी. एन.पाटील, प्रा. समीर गोवंडे ,प्रा. सौ. मंजुषा कुलकर्णी, प्रा. तंनगी के. जी.प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. एम .डी .ठोंबरे ,प्रा.आर. एम.कोळेकर, प्रा. राहुल भोसले, प्रा आर .जे .पाटील आदी उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या सभासद वाढीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे ठरले असून निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले.

