एरंडोल तहसिल कार्यालय आवारात भारतीय संविधान उद्देशिकेशिय सह संविधान स्थंभ उभारण्याची मागणी....
कासोदा तालुका एरंडोल
एरंडोल येथील तहसिल कार्यालय च्या आवारात भारतीय संविधान उद्देशिकेशिय सह संविधान संतभ उभारण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कडून तहसीलदार एरंडोल कडे लेखी निवेदन व्दारे मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करणेत आले आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची स्वंतत्र राज्यघटना अस्तित्वात आली. देशाच्या या सवोर्त्तम कायदा व घटनेने सवॅना स्वातंत्र्य अधिकार दिले. त्याच बरोबर सवात मोठी लोकशाही प्रधान संविधानिक राष्ट्र म्हणून हा देश पुढे आला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्य घटना लिहली. प्रत्येक भारतीयाला मूलभूत अधिकार आणि हक्क मिळाले. यांची माहिती व महत्व समजावे म्हणून संविधान नवीन पिढीला माहिती व्हावी .त्यामध्ये राष्ट्र प्रेम निर्माण व्हावे , एकात्म बंधू भाव आणि समान तेचे मूल्य तरूण पिढी मध्ये रूजावेत यासाठी एक राष्ट्रीय संविधानिक प्रतिक म्हणून यासाठी आपल्या एरंडोल कार्यालय आवारात भारतीय संविधान उद्देशिकेशिय सह संविधान संतभ उभारण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, नासिक विभागीय महसूल आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी भाग एरंडोल यांना देण्यात आले आहेत. सदर निवेदनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद बेहेरे, सिताराम मराठे, गजानन पाटील, सुनील खोकरे, मन्सूर पठाण, इत्यादी च्या सह्या आहेत.

