श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर आयोजित घरगुती श्री गणेश उत्सव सजावट स्पर्धा २०२१ या स्पर्धेला श्रीरामपूरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली पार पडले. घरगुती गणपती बाप्पाची उत्कृष्ट सजावट करणाऱ्या ११ स्पर्धकांमध्ये प्रज्ञा तुंगर यांचा प्रथम क्रमांक आला व पल्लवी शेडगे यांचे दुसरे क्रमांक तर शीतल पाटील यांचे तिसरे क्रमांक आले.
यावेळी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,
तुषार बोबडे जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष डॉ, संजय नवथर, विधानसभा अध्यक्ष या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम २६/९/२०१रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह नाॅदर्न ब्रँच, श्रीरामपुर या ठिकाणी पार पडला. यावेळी
*गणेश दिवसे* तालुकाध्यक्ष
*निलेश लांबोळे* शहराध्यक्ष,
*विशाल शिरसाठ* विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष
*विकी राऊत* विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष,
*अक्षय सूर्यवंशी* विद्यार्थी सेना शहराध्यक्ष
*उदय उदावंत* तालुकाध्यक्ष सहकार सेना
*भास्कर सरोदे* तालुका अध्यक्ष कामगार सेना
*शिवनाथ फोपसे* तालुकाध्यक्ष शेतकरी सेना, वरील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की कोरोना आजाराचे धाक दाखवून हिंदूंच्या सण-उत्सवावर राज्य शासनाने जाणून बुजून निर्बंध घालून हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचे महापाप हे सरकार करत आहे. हिंदूंचे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून हिंदूंची एक जूट समाजाला दिसावी व हिंदु समाजात नवचैतन्य निर्माण होवुन समाज जाती-जाती मध्ये न विभागला जाता धर्माच्या नावाने आपण सर्व ओळखले जावे.
जर हिंदूंच्या आया-बहिणींना कोणी त्रास देत असल्यास मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.अशा समाजकंटकांचा बदोबस्त आम्ही मनसे स्टाईलने करु. तसेच धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी धार्मिक लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी हिंदूंच्या सण उत्सव निमित्त असे विविध उपक्रम सदैव साजरे करत राहू. असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले.
मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे म्हणाले की हिंदूंची सुरक्षा,रक्षणासाठी व हिंदूंच्या प्रत्येक समस्या अडीअडचणी साठी धावून येणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सदैव हिंदू रक्षक म्हणून काम करत असतो असे याप्रसंगी व्यक्त केले, श्रीरामपूर विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर म्हणाले की 33 कोटी देवी देवता मध्ये प्रथम प्राधान्य हे गणपती बाप्पा ला असते. हिंदूंमध्ये सण उत्सव साजरा करतांना त्यांचा उत्साह वाढावा म्हणून गणेश उत्सवा निमित्त आम्ही ही सुरुवात केलेली आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव ईश्वर जगताप, शहर सरचिटणीस रोहित जौंजाळ, शहर चिटणीस अमोल साबणे,शहर उपाध्यक्ष मनोज जाधव, राजू शिंदे,बाबासाहेब भालेराव, संदीप विशंभर,तालुका संघटक मनविसे अतुल तारडे , कामगार सेना उप चिटणीस नंदू गंगावणे,विभाग अध्यक्ष,मारुती शिंदे, सागर त्रिभुवन, सचिन धोत्रे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, सुरेश शिंदे, सद्दाम शेख, नितीन खरे, बाप्पू लबडे, आधी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष मनविसे यांनी केले व उपस्थितांचे आभार निलेश सोनवणे शहर संघटक यांनी मानले.

