कुणातरी नेत्याचा मुलगा नको !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
भ्रष्टाचाराने बरबटलेले एखाद्या टोळीचे नेतृत्व नको !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
सामान्य जनतेच नेतृत्व करण्यापेक्षा खादितल्या गुंडांचे नेतृत्व करणारा पुढारी नको !!
न केलेली कामे मीच केली म्हणून फेकणारा फेकू नेता नको !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
नुसते भाषणं नकोत !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा जनतेच्या प्रश्नाचे राजकारण करणारा नको !!
आम्हाला नगरसेवक हवाय ….
जनतेला पाणी देणारा पाणी दाखवणारा नको !!*
आम्हाला नगरसेवक हवाय …
रस्त्यावरचे खड्डे बुजवणारा रस्ते खड्ड्यात घालणारा नको !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
युवकांना शाळा कॉलेज दाखवणारा धाबे दाखवणारा नको !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
जनतेच्या प्रश्नात लक्ष्य घालणारा बघून घेतो म्हणणारा नव्हे !!
आम्हाला नगरसेवक हवाय …
काम जनतेने जनतेच्या पैश्याने केले म्हणणारा … मीच केले म्हणून मिरवणारा नको !!
💐 सर्व भावी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा !💐

