सुरवड येथे प्रहार अपंग क्रांती संस्था शाखेचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यामध्ये प्रहार अपंग क्रांती संस्था अतिशय प्रभावी होत असताना दिसत असून यामध्ये अपंग बांधवांचे संघटन वाढत असून गेल्या महिन्यात वडापुरी याठिकाणी तर आज सुरवड येथे शाखेचे उद्घाटन सोहळा (दि.२६ सप्टेंबर) रोजी पार पडला.
या कार्यक्रमासाठी अनिल मेमाने अध्यक्ष प्रहार संघटना पुणे जिल्हा, बाबासाहेब जगताप कार्याध्यक्ष , बाबासाहेब पाडुळे उपाध्यक्ष, आनंदराव गायकवाड अध्यक्ष इंदापूर तालुका, सौ दीपालीताई वाघमोडे महिला अध्यक्ष इंदापूर तालुका, सुशाला ढाणे महिला उपाध्यक्ष , रामदास चव्हाण सहसचिव , नाना लावंड कार्याध्यक्ष , सचिन सूर्यवंशी शहराध्यक्ष इंदापूर , ज्ञानदेव कांबळे प्रसिद्धी अध्यक्ष इंदापूर तालुका, शोभा शिंगाडे महिला कार्याध्यक्ष , दादा पाटोळे इंदापूर शहर उपाध्यक्ष .
तसेच सुरवड गावातील सुरेश मेहेर माजी पंचायत समिती सदस्य इंदापूर ,दादासो घोगरे संचालक नीरा भीमा कारखाना , दिलीप घोगरे माजी सरपंच ग्रामपंचायत सुरवड, तुकाराम शिंदे युवा नेते , तात्यासाहेब कोरटकर सदस्य ग्रामपंचायत सुरवड, दत्तात्रय घोगरे सचिव भैरवनाथ पाणी पुरवठा सुरवड , सुरेश तोरसकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, प्रदीप कांबळे सदस्य ग्रामपंचायत सुरवड, धनाजी वाघ सदस्य ग्रामपंचायत सुरवड , सतीश माने माजी उपसरपंच सुरवड , शिवाजी नलावडे सामाजिक कार्यकर्ते सुरवड, साहेबराव घोगरे माजी संचालक खरेदी-विक्री संघ इंदापूर तालुका, चंद्रकांत शेरकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड , विठ्ठल विरकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, दशरथ घोगरे मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय बावडा इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब जगताप म्हणाले की, अपंगाच्या अनेक समस्या आहेत. समस्या वरती आपण एकजुटीने संघर्ष करून निराकरण करू तसेच अपंगाच्या विविध योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी संघटनात्मक बांधणी ची गरज असून एकजुटीने एकदिलाने आपण प्रखरतेने काम केले तर कोणतेही कामे साध्य होतात तसेच शासकीय योजना राबवण्यासाठी जे सहकार्य व मार्गदर्शन पाहिजे असेल ते आम्ही देण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे सुरवड येथील बांधवांनी सर्व क्षेत्रातून सहकार्य करावे अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
प्रहार अपंग क्रांती संस्था सुरवड शाखेचे अध्यक्ष गणेश ढेरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन सर्व ग्रामस्थांना सामावून घेऊन केल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार सुरवड चे अध्यक्ष गणेश ढेरे यांनी केले.

