shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी हर्षल घोगरे यांचा केला सत्कारकेंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी) च्या परिक्षेत देशात ६१४ वे स्थान मिळवून यश

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी  हर्षल घोगरे यांचा केला सत्कार

केंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी) च्या परिक्षेत देशात ६१४ वे स्थान मिळवून  यश
इंदापूर प्रतिनिधी: (दि.२६ सप्टेंबर२०२१) केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या परिक्षेत देशात ६१४ वे स्थान मिळवून  यश संपादन केलेल्या बावडा गावच्या हर्षल भगवान घोगरे यांचा सत्कार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील,जेष्ठ नेते विजय घोगरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर, जालिंदर गायकवाड, विद्यासागर घोगरे, जालिंदर भिसे,नागेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सन २०२० च्या परिक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती फेब्रुवारी ते जुलै या दरम्यान घेण्यात आल्या. हर्षल घोगरे यांचे शिक्षण बी.टेक. झाले असून, दिल्ली येथे या परीक्षेचा दोन वर्षे अभ्यास करत होता. जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवत त्यांनी हे यश संपादन केले.


यावेळी घोगरे यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीराज भरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
close