कळवण :पोलिस निरीक्षक श्री प्रमोदजी वाघ यांची कळवन तालुका पोलिस स्टेशन जिल्हा नाशिक येथुन दिंडोरी तालुका पोलिस स्टेशन जिल्हा नाशिक येथे बदली झाल्यानंतर कळवन येथील पोलिस कर्मचारी व तालुक्यातील कार्यकर्ते यांनी त्यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी नोकरी सांभाळून केलेल्या सामाजिक कार्याचे गौरव करण्यात आले.
त्यांनी त्यांच्या कामातून वेगळी छटा निर्माण केली आहे. अनेकांना योग्य मार्गदर्शन व न्याय दिल्या मुळे त्या कामाचा गुणगौरव व्यक्त व्हावा म्हणून त्यांच्या वर पुष्प वृष्टी करण्यात आली. असे क्षण लाखातून एखाद्याच अधिकारी यांच्या नशीबी असते. अशा प्रकारे प्रत्येक अधिकारी यांनी कामगिरी करावी हिच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
!!..जय हिंद जय भारत.. !!

