प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल २५ लाख रु.चा गुटखा पकडला आहे.
केज तालुक्यात आणि शहरात सुरू असलेल्या गुटखा विक्री या बाबत माहिती वरून विषेश पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने दि. २ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या सुमारास केज पोलीस स्टेशन हद्दीत क्रांतीनगर भागात, वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोडाउनवर छापा टाकला असता. त्यात १७ लाख ४६ हजार २२० रु किमतीचा गुटखा मिळून आला. या मध्ये पप्पू कदम हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला. त्याच्या विरुद्ध भा. द. वि. २७२, २७३ व ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच रात्री ९:१५ वा. च्या सुमारास केज पोलीस स्टेशन हद्दीत, खुरेशी मोहल्ला, दर्गा रोड, केज येथे गोडाउनवर छापा टाकला. त्यात ७ लाख २ हजार ८६० रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. या मध्ये अबुजर खैरउमिया खुरेशी हा प्रतिबंधित गुटखा साठा करताना व विक्री करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. २७२, ३७३, ३२८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

