shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबा कारखान्याची जमीन शेतकऱ्यांचे थकीत देणे देण्यासाठी साखर आयुक्तांनी जमिनीचा लिलाव केला..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
अंबा कारखान्याची जमीन विक्रीशी आपला काहीही संबंध नसून शेतकऱ्यांना बिला ची रक्कम अदा करण्यासाठी साखर आयुक्तांनी जमिनीचा लिलाव करून आलेल्या रक्कमेतून शेतकऱ्यांचे देने दिले त्यामुळे या लिलाव प्रक्रियेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा अंबा कारखान्याचे चेअरमेन रमेश आडसकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला 
 
            
अंबा कारखान्याची जमीन आपण कवडीमोल विक्री केली असा आरोप होतो आहे यावर आपले मत काय ? असा सवाल केला असता आडसकर म्हणाले की ,
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२०-२१ रोजी संचालक मंडळाने घेण्याचे ठरविले. हंगाम सुरू करीत असताना आर्थिक अडचणी होत्या. परंतु हा कारखाना टिकावा ह्या उद्देशाने महाराष्ट्रातील बरेचसे आजारी कारखाने केंद्र शासनाकडे कारखान्याचे पुर्नजीवतासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या हंगामात कारखाना चालू राहिला त्याचा फायदा कारखान्याला होईल. म्हणून आम्ही हंगाम घेतला.

       
पूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक कारखान्याला कर्ज देत होती. परंतु २००९ साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक आले. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या कारखान्याचे नेटवर्क उणे आहे. अशा कारखान्याला बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. परंतु ह्या भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आम्ही हा कारखाना शेतकऱ्यांकडून ठेवी घेवून २००९ पासून आजपर्यंत चालवित आहोत हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले, काम केलेल्या काळातील कामगारांचे पगारही केले.

             
मागील वर्षी सन २०२०-२१ साली हा कारखाना चालु करण्याचा निर्णय संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहस्तव घेतला. परत सभासदांकडून ठेवी घेतल्या. व्यक्तीगत नावावर कर्ज काढले व कारखान्याच्या दुरुस्तीचे काम केले. ऊसतोड यंत्रणा भरली. नोव्हेंबर महिन्यात कारखाना सुरु झाला. अंदाजे हा कारखाना १०० दिवस चालला. परंतु या १०० दिवसामध्ये कारखान्याचे बॉयलरमध्ये सातत्याने बिघाड होवून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सुरुवातीला कमी रिकव्हरीचा (कोवळा) ऊस आल्यामुळे कारखान्याची रिकव्हरी वाढली नाही. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आचानक बॉयलर पुन्हा बंद पडल्यामुळे कारखाना बंद झाला. 

तोडणी वाहतुक विस्कळीत झाली. त्यामुळे हा कारखाना नाविलाजास्तव बंद करावा लागला. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान झाले. कारखान्याने १ लाख ७३ हजार १३९.१६७ मे. टन ऊसाचे गाळप केले. यातून १ लाख ३४ हजार क्विंटल साखर निघाली. तसेच ९ लाख लिटर स्पिरीट निघाले. याच्या विक्रीमधून जी रक्कम मिळाली त्या मधून ऊस बिलाच्या ७६ टक्के एवढी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. 

उर्वरित कमी पडलेली रक्कम शासनाने थकहमी देवून सुद्धा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी दिली नाही. त्यामुळे मा. साखर आयुक्त यांनी शेतकऱ्यांची राहिलेली २४ टक्के एवढी ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्त व कारखान्यांकडे तगादा लावला. त्यामुळे साखर आयुक्त यांनी कारखान्याची स्थावर मालमत्ता विकून उर्वरित शेतकऱ्यांची राहिलेली देणी देण्यात यावीत असे आदेशित केले. मा. साखर आयुक्त यांच्या आदेशानुसार कारखान्याच्या जमिन विक्रीतून जी मिळालेली रक्कम आहे ती सर्व रक्कम शेतकऱ्याचे खात्यावर वर्ग केली आहे. 

वास्तविक अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील जुन्या कारखान्यापैकी एक असून ह्या कारखान्याच्या बरोबरीचे सर्व साखर कारखाने सध्या बंद पडलेले आहेत. त्यानंतर काही कारखाने झाले. ते सुद्धा कारखाने पडलेले आहेत. हा कारखाना टिकावा म्हणून आम्ही व संचालक मंडळ गेल्या १५ वर्षापासून कारखाना चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि भविष्यकाळात सुद्धा हा कारखाना आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही गेल्या १५ वर्षापासून अनावश्यक खर्चाला फाटा देवून हा कारखाना चालवित आहोत.                           

कारखान्याच्या चेअरमन व संचालकांनी कारखान्याकडून कोणतीही गाडी, गेस्टहाऊस या सोयीसुविधा घेतल्या नाहीत. कारखान्याचे प्रत्येक खर्चात बचत केली. भविष्यात हा कारखाना सर्वांना सोबत घेवून आम्ही चालविणार आहोत अशी माहिती चेअरमन रमेशराव आडसकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
close