-----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
केज तालुक्यात शेळ्या सांभाळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बळजबरीने बलात्कार केला. ती अल्पवयिन मुलगी गरोदर राहिल्याचे कळताच तिला विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावात शेळ्या सांभाळणाऱ्या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने तीन महिन्या पूर्वी म्हसोबचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारात बळजबरीने बलात्कार केला. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती होताच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याची माहिती अल्पवयीन मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितल्या नंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून दि. २ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात त्या नराधमाचा विरुद्ध फिर्याद दिली. त्या नुसार दि. २ सप्टेंबर रोजी त्याच्या विरुद्ध नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
यांनी गुन्हा दाखल करून प्रभारी ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी या करीत आहेत.

