प्रमोद चौधरी
एरंडोल /जळगाव जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल येथे गर्भवती महिलांना बेबी केअर कीटचे वाटप.
एरंडोल- गर्भवती महिलांनी वेळेवर आहार घेवून आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.पंचायत समिती सभागृहात एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोषण मेळावा आणि गर्भवती महिलांना बेबी केअर कीट वाटपप्रसंगी ते बोलत होते.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते गर्भवती महिलांना बेबी केअर कीट आणि स्थलांतरित मजुरांना पोषण कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी गर्भवती महिलांनी स्वता:सह बाळाची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.कुपोषण बळी टाळण्यासाठी शासनस्तरावऋण राबविण्यात येणा-या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.पोषण अभियान योजनेची माहिती कार्यकर्त्यांनी लाभार्थ्याना द्यावी अशी सुचना त्यांनी पदाधिका-याना दिली.शासनातर्फे पोषण आहार अभियान सुरु करण्यात आले आहे.या अभियानात संपूर्ण देशातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येणार आहे.यामध्ये आहाराचे घटक आणि त्यांचे महत्व याबाबत माहिती देण्यात येणार आहे.यावेळी तळई येथील स्मरणिका फाउंडेशनच्यावतीने तालुक्यातील वीस कुपोषित बालकांना डोंगरलाल महाजन आणि advt.आकाश महाजन यांचेकडून पौष्टिक आहार कीटचे वाटप करण्यात आले.तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते दिपाली ठाकरे,राणी ठाकरे,ललिता ठाकरे,रीना हातेले,दिपाली भिल,लक्ष्मी गोसावी,सपना भिल,शितल पाटील,संगीता मोरे या गर्भवती महिलांना बेबी केअर कीटचे वाटप करण्यात आले.तर नागदुली येथील रवींद्र भिल रायसिंग भिल,विकास भिल यांचेसह स्थलांतरित मजुरांना लाभ मिळण्यासाठी पोषण कार्डचे वाटप करण्यात आले.बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील यांनी प्रास्ताविक केले.तुषार वडगावकर यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास सभापती शांताबाई रोकडे,उपसभापती अनिल महाजन,विवेक पाटील,लहू महाजन,बाळू धनगर,युवासेनेचे तालुका प्रमुख बबलू पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,रतन पाटील,गटशिक्षणाधिकारी व्ही.एच.पाटील,डॉ.अरविंद वानखेडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी रवींद्र नाकवे,संतोष पारीस्कर,चेतन गिरासे,पर्यवेक्षिका सुनंदा महाजन,सुनंदा चौधरी,विजया बडगुजर,भारती सुतार यांनी सहकार्य केले.

