shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मधील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये घाणीचे साम्राज्य: ना रस्ते ना पथदिवे..!!

साथरोगाची लागण झाल्यास जबाबदार कोण ? 

      -- वॉर्डातील नागरिकांचा संतप्त सवाल  !! 

-----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील वसंत महाविद्यालयाच्या पाठी मागे , अहिल्यादेवी होळकर गल्ली तसेच समता नगर या वॉर्ड क्र. पाच मध्ये असणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी साठलेले आहे. तसेच नाल्या आणि पथदिवे देखील नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.


केज येथील वसंत महाविद्यालयाच्या पाठी मागे वॉर्ड क्र. ५ मधील नागरी वस्तीत रस्त्यावर पाणी साठलेले आहे. तसेच अनेक भागात पक्के रस्ते देखील नाहीत आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, पथदिवे नाहीत. यामुळे रात्रीच्या वेळी चोऱ्या होण्याची शक्यता आहे. तसेच कच्च्या रस्ताच्या बाजूला गवत वाढलेले असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होण्याची भिती आहे. पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक टाकी देखील फुटून खराब झाली आहे. 

या भागातील नागरी समस्यांकडे कोणाचे लक्ष नसल्याने वॉर्ड क्र. पाच हा अनाथांचा वॉर्ड आहे की काय ? असा सवाल येथील नागरिक विचारीत आहेत. या भागातील नागरिक हे बहुतांशी मोलमजुरी करणारे असल्याने त्यांना कोणी वाली नाही. म्हणून आता तरी प्रशासनाने या वॉर्डात नागरी सोयी सुविधा व मूलभूत सेवा देण्याची मागणी येथील नागरिकातून होत आहे.


-----------------------------------------------------


" रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डास झालेले आहेत. त्यामुळे डेंगू, कॉलरा, थंडीताप तसेच कावीळ आणि इतर साथरोग याची लागण होण्याची भीती आहे. तसेच पथदिवे नसल्याने चोऱ्या आणि व सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील भीती आहे. "

            --- भाई राजन गायकवाड,

                       नागरिक केज
close