ग्रामीण रुग्णालय साकुर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अडीच वर्ष वयोगटातील बालकांसाठी देण्यात येणारा अ-जीवनसत्त्वाचा डोस मागील एक वर्षापासून उपलब्ध नाही असे ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ, डॉक्टर व फार्मासिस्ट यांच्याद्वारे नागरिकांना सांगण्यात येत होते.
सदर साकुर ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत जवळपास 17 गावे येत असून मागील एक वर्षापासून अडीच वर्षाच्या कोणत्याही बालकाला अ-जीवनसत्त्वाचा डोस दिलेला नाही या गोष्टीचे गांभीर्य तसेच बालकांच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच मा.जिल्हाधिकारीसाहेब अहमदनगर यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास १०दिवसांत अडीच वर्ष वयोगटातील बालकांसाठी ग्रामीण रुग्णालय साकुर येथे अ-जिवनसत्व डोस उपलब्ध झाले आहेत.
आठवड्यातील प्रत्येक शनिवारी लसीकरण सुरु राहणार आहे. असे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे, तरी डोसपासुन वंचित राहीलेल्या अडीच वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांनी ग्रामीण रुग्णालय साकुर येथे आपल्या बालंकाना अ-जिवनसत्व डोस घेण्यासाठी यावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी केले आहे.

