shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(८७)... वेत(Calamus rotang.)


पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्यादृष्टीने विचार केला तर धनू राशीतील पूर्वाषाढा नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेत हा आहे .हा वेलवंशीय असून समुद्रसपाटीपासून ४५७ मीटर उंचीपर्यंत उत्तम येतो. याच्या सर्वांगावर काटे असतात. मध्यम आकाराचा वेल जाडा, वाळलेल्या गवताच्या रंगाचा, चकाकणारा असतो.

ही वेल झाडावर चढते. पश्चिम घाटामध्ये सदाहरित निसदाहरीत वनांमध्ये सापडते. या वेलीला वाढण्यासाठी सावली लागते. ज्या ठिकाणी पालापाचोळा असून ह्यूमस तयार होतो व लाल माती असते अशा जमिनीमध्ये हा वेल वाढतो. याला प्रखर सूर्यप्रकाश सहन होत नाही. जून-जुलैमध्ये याला बी येते. पाण्यातील प्राणी, जलचरांचा दंश झाला तर वेताचा कल्प उपयोगी पडतो. यामुळे आग, जळजळ थांबते. 

याचे बी जुनं जुलैमध्ये पक्व होऊन पावसाळ्यात रोपे तयार होतात.वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
close