shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (८६)....देवबाभूळ..!!


 *Acacia farnesiana
पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास धनु राशीच्या मूळ नक्षत्राचा पर्यायी वृक्ष देवबाभूळ हा आहे.
या झाडाला विलायती कीकर, किंकर, कासेबाभूळ असेही म्हणतात. याचे मूळस्थान आफ्रिकेत आहे. देवबाभूळ हे साधारण तीन ते पाच मीटर उंचीचे झुडूप असते.

हलक्या मुरमाड जमिनीत तसेच नदीपात्रातील वाळूच्या, पोयट्याच्या जमिनीत हे झाड उत्तम वाढते. साधारणपणे तीनशे ते चारशे मिलिमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात व ४४ डिग्रीपर्यंत तापमान असलेल्या प्रदेशात हे झाड येते. या झाडाला तिसऱ्या वर्षापासून पिवळी सुगंधी फुले मार्च व नोव्हेंबर महिन्यात येतात . फुलांपासून परफ्युॅम Cassie Perfume  बनवतात.

फुलांपासून एका देठाला तीन गोल, जाड शेंगा  येतात. बाभळीच्या बिया प्रमाणेच या बिया असतात. बिया अंडाकृती चॉकलेटी काळ्या रंगाच्या असतात. साल व शेंगांमध्ये टॅनिन असते. 

याच्या पानापासून चटणी करतात. शेंगाच्या आतील सफेद पापुद्रा उष्णतेमुळे तोंड आले असल्यास खातात.
याचा पाला शेळ्या मेंढ्या आवडीने खातात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close