shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेश उत्सव कोरोनाचे नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आव्हान..!!

पोलिसांना सहकार्य करा गणपती विसर्जनासाठी डीजे किंवा इतर वाद्य वाजल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील गणेश उत्सवात बंदी आहे - सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप...


नगर प्रतिनिधी ( शिवा म्हस्के)

यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जमा  झालेल्या देणगी माध्यमातून सार्वजानिक ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा पुस्तक संच भेट देणे , गरीबांना किराणा वाटप, गावा गावात स्वच्छता मोहीम राबविणे,

रक्तदान शिबीराचे आयोजन करणे या सारखे विधायक कार्य करून गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतिने साजरा करावा , असे आवाहन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले . नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिचोंडी पाटील येथील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर गणेशउत्सवा संबंधी विचार विनिमय करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत सपोनि राजेंद्र सानप बोलत होते . यावेळी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे , दीपक हजारे ज्ञानेश्वर ठोंबरे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ॲड .अमित बोरा , अंबादास कोकाटे , सचिन खडके , शरद कोकाटे , विष्णु भद्रे , राजु तनपुरे , विजय गाडे आदी सह गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते . गणेश उत्सवाच्या नियमावली विषयी माहिती देत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले.





की कोरोनाच्या संसर्गामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा . शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे . ज्या गणेश मंडळांना गणपती उत्सवात सहभागी होऊन गणेश मूर्तीची स्थापना करावयाची आहे , त्या मंडळांनी ग्रामपंचायतचे ना हरकत व पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे . विनापरवानगी

गणेश मूर्तीची स्थापना करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती स्थापन करू नये . त्याच प्रमाणे मूर्ती स्थापनेसाठी घातलेले मंडप वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या पद्धतीचे असावेत . गणेश मूर्ती स्थापनेच्या दिवशी किंवा विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक

काढण्यास बंदी आहे . त्यामुळे कुठल्याही मंडळाने मिरवणूक काढू नये.डीजे किंवा इतर वाद्य वाजवण्यास ही बंदी आहे. गणेश विसर्जन मिरवणुक न काढता साध्या पद्धतीने कृत्रिम विसर्जन स्रोत निर्माण करून त्यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करावे . पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणारे स्रोतम्हणजे विहिरी अथवा नदी तलावात श्री च्या मूर्तीचे विसर्जन करू नये. शक्यतो एक गाव एक गणपती उपक्रमात सहभागी होऊन गणेश उत्सव साजरा करावा . यावर्षी नगर तालुक्यातील वीस गावांमधून एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सपोनि राजेंद्र सानप यांनी दिली. 

बैठकीचे प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य अशोक कोकाटे यांनी केले. अनेक गावती तरुण मंडळी या कोरोना परस्थिती लक्षात घेऊन समात हिताचे कार्य करण्याचा मानस केला आहे असे तरुण वर्गानी या वेळी आवर्जुन सांगितले.

close