shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी २४ तासाच्या आत सोनसाखळी चोराला ताब्यात घेऊन मुद्देमाल केला हस्तगत..!!



-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज अनेक वेळा चोरी झालेला मुद्देमाल हा सापडत नाही त्यामुळे बहुतांशी वेळा कोर्ट कचरा आणि पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागू नये म्हणून लोक चोरी झाली तरी तक्रार देण्याचे टाळतात मात्र या चोरीच्या बाबतीत एक सुखद अनुभव पाहायला मिळाला. एका सोनसाखळी चोराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करून तो न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाला परत केला.


या बाबतची माहिती अशी की, दि. २३ ऑगस्ट रोजी हनुमंत पिंपरी येथील प्रसिद्ध महादेव मंदिर परिसरात येथे रोजी बाबासाहेब बिक्कड यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका चोराने अलगद काढून घेतली. ही माहिती बाबासाहेब बिक्कड यांनी केज पोलिसांना देताच प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक नामदास, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक गवळी यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दुल्लत यांनी मोबाईल सिडीआरचा तपास करून अवघ्या चोवीस तासात आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कडून मुद्देमाल हस्तगत केला. 


त्या नंतर प्रथनवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेशाने ती चोरी गेलेली चैन बाबासाहेब बिक्कड याला याला परत केली. यामुळे केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून अवघ्या २४ तासात आरोपीला अटक करून त्याच्या कडून मुद्देमाल मिळवून तो मूळ मालकास परत केला याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
close