shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार श्रीराम तांदळे यांच्यावरील खोटा खडणीचा गुन्हा रुद्द करा : केज पत्रकारांची मागणी..!!



----------------------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
सामाजिक संस्थेच्या आर्थिक घोटाळा याचा विरोधात बातम्या प्रकाशित केल्या म्हणून केज येथील एका पत्रकारावर दाखल केलेला खडणीचा गुन्हा रद्द करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या संस्थेची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केज येथील पत्रकारांनी प्रभारी ठाणे प्रमुखाकडे  निवेदनांद्वारे केली आहे.


या बाबतची माहिती अशी की, नवचेतना सर्वांगीन विकास केंद्राच्या सचिव मनीषा घुले यांनी केज पोलीस ठाण्यात दि. ८ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात पत्रकार श्रीराम तांदळे यांच्या विरुद्ध गाडी अडवून खडणी मागणे व जीवे मारण्याची धमकी देणे. अशा आशयाची तक्रार दिली होती त्या वरून श्रीराम तांदळे 

महिला सचिवांची गाडी अडवून चाकू दाखवून शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत दोन लाख रु. ची खंडणी मागितल्या प्रकरणी केज पोलिसात तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी आज केज येथे सर्व पत्रकारांनी जेष्ठ पत्रकार हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षेतखाली आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, दशरथ चवरे, धनंजय कुलकर्णी, विजयराज आरकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीत श्रीराम तांदळे यांनी सदर संस्थेच्या भ्रष्टाचार आणि अनियमित व्यवहार या संदर्भात वर्तमानपत्रातुन उठविलेला आवाज हा योग्य असून केज तालुक्यातील सर्व पत्रकार श्रीराम तांदळे यांच्या पाठीशी आहेत. तसेच या प्रकरणी तांदळे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा बनावट असल्याने तो रद्द करून बनावट गुन्हे दाखल केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. दरम्यान या वेळी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. त्यात श्रीराम तांदळे यांच्यावरील गुन्हा रद्द करावा खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी सीडीआर काढून चौकशी करावी

आणि सदर संस्थेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी यात केली आहे.
close