शिर्डी | दि. ९ प्रतिनिधी :
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय महाजन यांची पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली. व्यवस्थापन अध्यक्ष रवीभाऊ वैद्य यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विकास सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे पाटील यांनी केली यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रवीण दात्रे ,फंडसाहेब,पोलीस बाॅईस असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाबळे, साईश्रद्धा प्रतिष्ठानचे सल्लागार धनसिंग पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.

