shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोरया हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते..!!


 राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :-
अलिबाग मध्ये बालरोग तज्ञ डॉ. सागर खेदू यांच्या मोरया हॉस्पिटल मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ( सशुल्क ) कोविड प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. 

याचे उद्घाटन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत शेकाप महिला आघाडी प्रमुख, नगसेविका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. विनायक पाटील, डॉ. गवळी, डॉ. रूपाली खेदू, डॉ. राहुल म्हात्रे, चेंढरे उपसरपंच यतीन घरत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

( छायाचित्र – अमोल नाईक )
close