shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोधेगावचा आवाज अन् आधार हरवला ;बाळासाहेब घोरतळे गुरुजी कालवश


बाळासाहेब घोरतळे गुरूजी म्हणजे गावचे चालतेबोलते न्यायपीठ

प्रतिनिधी : संजय वायकर

बोधेगाव :  दि . ९ / शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील घोरतळे पाटील कुटूंबातील 'न भूतो न भविष्यती' असे व्यक्तीमत्व असलेले बाळासाहेब राधुजी घोरतळे (गुरूजी) यांचे आज गुरूवार (ता.९ ) रोजी सकाळी वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. परिसरात 'बाळासाहेब गुरूजी' व आप्त स्वकीयांमध्ये 'नाना' या नावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
            
 बाळासाहेब घोरतळे गुरूजी हे १९६८ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर रूजू झाले. त्याकाळात त्यांनी सेवातंर्गत डीएडचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव, बीड जिल्ह्यात माजलगाव, गेवराई, धुमेगाव आदी ठिकाणी त्यांनी सेवा पूर्ण केली. शैक्षणिक क्षेत्रात सरळ अन् कटुता न ठेवणाऱ्या बाळासाहेब गुरूजींनी भीष्माचार्य म्हणून भुमिका निभावली. शाळेत विद्यार्थ्यांवर असलेल्या आदरयुक्त धाकाप्रमाने गावातील थोरामोठ्यांवर ही गुरूजींचा धाक, दरारा जबरदस्त होता. गावातील कुठलीही दुःखद घटना, अंत्यविधी असो, गुरूजींचा त्या कुटूंबातील आया-बहीणींसह पुरूषांना धीर देणारा आवाज आजही कानी घुमल्याशिवाय राहत नाही. गावातील वादविवाद असो वा भांडणतंटे वा भाऊबंदकीचे बखेडे गुरूजींची भुमिका महत्त्वाची असायची. 

प्रत्येकजण गुरूजींचा 'का रे भडब्या' हा शब्दच प्रमाण मानून एखाद्या विद्यार्थ्यांसम वादातून माघार घेत असे. गावासाठी गुरूजी जणू एक चालते बोलते न्यायपीठ होते. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक चळवळीतील लहान-मोठी प्रत्येक व्यक्ती गुरूजींचा आदर करत असे. गावगाड्यातील अनेक संकटे त्यांनी लिलया पार केली. समाजामध्ये कळत नकळत त्यांचा एकप्रकारे आदरयुक्त असा धाक, दरारा होता. 

या व्यक्तीमत्वाच्या निधनाने आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या 'आभाळाचेही जणू अश्रू गोठले!' अशी स्थिती जाणवली. अंत्यसंस्कार प्रसंगी बाळासाहेब गुरूजींच्या निधनाने गावाचा आवाज अन् भक्कम असा आधार कायमचा हरवला गेल्याची भावना सेवानिवृत्त शिक्षक नारायण गर्जे, भाऊसाहेब पोटभरे, छावाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, सेवा संस्थेचे संचालक विठ्ठल तांबे, शिक्षक बँकेचे माजी संचालक तथा शिक्षक संघाचे नेते विनोद फलके, शेवगाव पत्रकार संघाचे सदस्य तथा केदारेश्वरचे माजी तज्ञ संचालक अनिल कांबळे, नामदेव कसाळ आदींसह उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.
close