प्रतिनिधी : रफिक शेख
वाळुंज : दि . ९ / नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वाळुंज येथील ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब रोहकले यांचा मा. खा. स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती श्री. अभिलाष घिगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसभापती श्री. संतोष शेठ म्हस्के, संचालक श्री. रेवणनाथ चोभे, श्री. बन्सीभाऊ कराळे, श्री. उद्धवराव कांबळे सहसंचालक मंडळ उपस्थित होते. वाळुंज येथिल ज्ञानदीप विद्यालयाच्या श्री. स्वामी विवेकानंद ग्रामविकास संस्थेचे संस्थापक सचिव असलेले भाऊसाहेब रोहकले सर १९९३ पासून सलग २८ वर्षे मुख्याध्यापक आहेत. .
राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे कौन्सिल सदस्य असून अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव आहेत. सन २००३पासून सलग १८ वर्षे नगर तालुका संघाचे सरचिटणीस होते.
नगर तालुका व जिल्हयातील अनेक विनाअनुदानीत माध्यमिक शाळांना त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे . त्यांच्या नेतृत्वाखालील वाळुंज येथिल ज्ञानदीप विद्यालयाचा सेमी इंग्लिश माध्यमातून सातत्याने १०० % निकाल लागत आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

