shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्यावरती गणरायाला उत्साहात निरोप- राजवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती

नीरा भीमा कारखान्यावरती गणरायाला उत्साहात निरोप
- राजवर्धन पाटील यांच्या हस्ते आरती
फोटो:- निरा भीमा कारखान्यावरती गणेशोत्सवाच्या सांगता समारंभ प्रसंगी श्रीगणेशाला निरोप देताना संचालक राजवर्धनदादा पाटील व मान्यवर.
इंदापूर:प्रतिनिधी( दि.१९ सप्टेंबर २०२१)
            शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज  रविवारी (दि.१९) उत्साहात सांगता करण्यात आली. यानिमित्ताने श्रीगणेशाची आरती कारखान्याचे संचालक राजवर्धनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
       यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! च्या निनादात राजवर्धनदादा पाटील यांच्या हस्ते श्रीगणेशाची मूर्ती विसर्जनासाठी जागेवरून उचलण्यात आली. तत्पूर्वी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व सौं.जयश्री झगडे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, दत्तात्रय शिर्के, हरिदास घोगरे, महादेव घाडगे, दादासो घोगरे, संजय बोडके, मच्छिंद्र वीर, सुभाष पोळ, माणिकराव खाडे, के.एस.खाडे, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत चीफ केमिस्ट पी.बी.पाटील यांनी केले. याप्रसंगी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
_____________________________

close