shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड याचा सत्कार...!

शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड याचा सत्कार...!
इंदापूर प्रतिनिधी: (दि १९ सप्टेंबर) रोजी निमगाव केतकी येथील पालखीतळ शेजारी राहणारा सर्वसामान्य कुटुंबातील  युवक तेजस गायकवाड याने गौरी गणपती उत्सवानिमित्त तयार केलेल्या देखावा सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.त्याने या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची १०० वर्षे (१८५७ - १९४७) सचिञ दाखवली असून त्यामध्ये  दिल्ली येथील लाल किल्ला , सरदार वल्लभभाई पटेल स्मारक , डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भेट , आजपर्यंत पंतप्रधान , भारतरत्न पुरस्कार विजेते , आॕलंपीकवीर , गेट वे आॕफ इंडिया असा अप्रतिम कलाकृती केली असून त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरवर्षी नवनवीन कल्पना व विषय घेवून अप्रतिम देखावे तयार करण्यात हातखंडा असलेला तेजस नवीन पिढीला प्रेरणा देणारा सजृनशील युवक आहे.
इंदापूर तालुका शिक्षक समितीचे पदाधिकारी यांनी तेजय गायकवाड या उपक्रमाचे कौतुक करून त्याचा फेटा , पुष्पहार , पुस्तक देवून सन्मान केला.प्रसंगी शिक्षक सोसायटी माजी चेअरमन किरण म्हेञे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , जुनी पेन्शन इंदापूर अध्यक्ष संतोष हेगडे , अतुल जौंजाळ , भुषण जौंजाळ , प्रताप शिरसट उपस्थित होते.
close