भिगवण येथे अखिल जे.के. ग्रुप च्या वतीने गौरी- गणपतीसजावट स्पर्धा संपन्न.
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण.
इंदापूर प्रतिनिधी: भिगवण येथे अखिल जे.के. ग्रुप च्या वतीने गौरी- गणपतीसजावट स्पर्धा पार पडली या स्पर्धेत 30 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी तीन बक्षिसे वितरण (दि.१८ सप्टेंबर) रोजी करण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक ३३३३ रु. बक्षीस
रोटरी क्लब भिगवण यांच्या वतीने देण्यात आले.सौ.प्रीती सोमनाथ पिसाळ यांनी तो मान पटकावला.देखावा- फौजी जीवन कसे असते पुलवामा हल्ला,भारत पाकिस्तान सीमा रेषा वर देखरेख फौजी कशी करतात.हा देखावा सादर केला होता. द्वितीय क्रमांक २२२२ रु.बक्षीस तुषार क्षीरसागर यांच्या वतीने देण्यात आले. शैलेश गडकर सर यांनी तो मान पटकावला.देखावा- महामारी नष्ट करून पुन्हा वारी पहिल्यासारखी चालू करणार हा संदेश त्यांनी दिला होता.तृतीय क्रमांक- श्री इंद्रजीत धुमाळ यांनी तो मान पटकावला देखावा- लस देण्याचा उपक्रम कसा असावा लस घेतल्याने काय फायदे होतात.तो देखावा त्यांनी सादर केला होता.
या कार्यक्रमाला रोटरी संस्थापक अध्यक्ष-सचिन बोगवत
अध्यक्ष-संजय खाडे ,ग्रामपंचायत सदस्य-तुषार शिरसागर प्रसाद, कमलेश गांधी व डॉ,अमोल खानावरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल जे.के. ग्रुप च्या वतीने सौरभ जमदाडे,प्रवीण शेलार,सागर कांबळे,आसिफ शेख, रेहान तांबोळी,अभी लोकरे,कुणाल धवडे भावेष धवडे,श्रीनिवास तांबे श्रीराम चिपाडे,सुरज शेलार,ओंकार जमदाडे, या सर्वांनी कार्यक्रमाचे आयोजन करून तो कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जमदाडे यांनी केले.

