shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

* कोरोनासह इतर सर्व संकट गणराया दुर कर- हर्षवर्धन पाटील*

*कोरोनासह इतर सर्व संकट गणराया दुर कर- हर्षवर्धन पाटील*
 इंदापूर प्रतिनिधी-
  राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाने आज अनंत चतुर्थी दिवशी दहा दिवस उत्साहमध्ये साजरा होत असलेल्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पर्यावरण पूरक गणरायाची प्रतिस्थापना करून गणरायाची या कुटुंबाने भक्तीभावाने सेवा केली होती आज या गणरायाला निरोप देताना हर्षवर्धन पाटील यांनी कोरोनासह इतर सर्व संकट गणराया दूर करून पुढील वर्षी लवकर या असे म्हणत भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.
    हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबामध्ये गणरायाचे तसेच गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पर्यावरण पूरक सजावट करून आनंदी वातावरणात दहा दिवस गणरायाची मनोभावाने सेवा करण्यात आली.देशभर कोरोना पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता.दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप घेऊन करण्यात आली असताना हर्षवर्धन पाटील यांनी भावपूर्ण वातावरणात गणरायाला कोरोनासह इतर संकट दूर करण्यासाठीची प्रार्थना केली.
  हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मनोभावाने गणेशाची आरती करून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
close