सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यास शिक्षणमंत्री ना .वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार. - शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे.
इंदापूर प्रतिनिधी:(दि १७ सप्टेंबर)सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन १ जाने २००४ नंतरच्या शिक्षकांवर वरिष्ठ वेतन श्रेणीत झालेल्या वेतन तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा वर्षाताई गायकवाड व मा शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचे समवेत बैठक घेवून लवकरच प्रश्न निकाली काढू असे आश्वासन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिक्षक समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदयजी शिंदे सासवड येथे आले असता सातव्या वेतन आयोग त्रुटी समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी भारत ननवरे , संतोष हेगडे , भुषण जौंजाळ , सुनिल वाघ , भारत गायकवाड , संतोष राक्षे , संदिप दुर्गे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

