shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेसच्या वृत्ताची घेण्यात आली दखल ; मत्स्यव्यवसाय विभागाचा भोंगळ कारभार ... आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

  इंदापूर: दि.१९ / इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1 येथे राजरोसपणे शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशाचे उत्पादन चालू आहे. याबद्दल शिर्डी एक्सप्रेस वृत्तपत्राने बातमी दिली होती. त्यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाला जाग आली व धावतपळत कारवाईचा फार्स केला गेला. परंतु त्यावेळी सर्व बेकायदेशीर मांगुर उत्पादकांना नोटीस देण्यात आल्या व बेकायदेशीर मांगूर संवर्धन व साठा नष्ट करण्यासाठी आठ दिवसाची मुदत  देण्यात आली.

      परंतु नोटीस चा मुदत कालावधी संपून एक महिना होऊन गेला तरी अजूनही फौजदारी कारवाई केली गेली नाही व बेकायदेशीर मांगुर चा साठा नष्ट केला गेलेला नाही. यावरून मत्स्य व्यवसाय अधिकारी व बेकायदेशीर  मांगुर उत्पादक व यांच्यामध्ये आर्थिक करार झाला की काय? असा सवाल कालठण नंबर 1 मधील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गावातील फिरस्ती कुत्र्याचा या व्यवसायामुळे मोठ्याप्रमाणात उपद्रव वाढला आहे .जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मांगुर उत्पादनासाठी वापरले जाणारे खाद्य मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

मांगुर उत्पादकांचे 15ते20 तलाव आहेत, त्यातून एकूण 40 ते 50 टन मालाचे उत्पादन होते.कारवाई  करताना फक्त शंभर ते दोनशे किलो मांगूर मारला जातो. त्यामुळे  अधिकाऱ्यांना थोडे पैसे दिले की काहीच होणार नाही असे मांगुर उत्पादक खाजगीमध्ये चर्चा करत आहेत व एक तलाव अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठीच ठेवणार आहोत असे म्हणत असतात, त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडणार नाही.
      मत्स्य व्यवसाय अधिकारी व मांगुर उत्पादक यांचे आर्थिक संबंध आहेत का व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार आहोत व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते गोविंद पाडुळे यांनी सांगितले.
close