भजन संध्या,भारुड प्रवचन - कीर्तन अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अ .नगर : दि . १९ / कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर, नेप्ती उपबाजार याठिकाणी 'हमाल मापाडी व्यापारी मित्र मंडळा'तर्फे शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१रोजी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आणि अहमदनगर जिल्हा पंचायतचे अध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश घुले यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली.
महाआरती झाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
हमाल मापाडी व्यापारी मित्र मंडळाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. नेप्ती उपबाजारात मोठ्या प्रमाणावर कांदा आवक असते.त्यामुळे त्याठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मुक्कामी असतात.अशा शेतकरी बांधवांसाठी भजन संध्या,भारुड प्रवचन - कीर्तन अशा प्रबोधनात्मक तसेच मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
यावेळी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक निखिल वारे,प्रकाश भागानगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बहिरु कोतकर, विश्वास शिंदे ,संदीप होळकर,भाऊसाहेब वाबळे, शिवाजी मोढवे,मच्छिंद्र दहिफळे, विष्णू ढाकणे नवसुपे महाराज, सोमनाथ वनवे, मच्छिंद्र गिरी, संदीप भोगाडे, आजबेताई, विजयकुमार बोरुडे, सुनील विधाते , समीर शेठ, दिलीप ठोकळ, भगवान तापकीर ,भाऊ कोतकर, विकास दहिफळे ,कुंदन बाचकर ,अजय वायभासे, संतोष झेंडे ,चंद्रकांत हंबर्डे ,आदींसह सर्व हमाल-मापाडी-व्यापारी व कामगार महिला उपस्थित होत्या.

