shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशास मुदतवाढ..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने राज्यभर कार्यरत अभ्यासकेंद्रातून विविध अभ्यासक्रम राबविले जातात. 

शैक्षणिक वर्ष 2021.22 करीता दि.1जुलै 2021 पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2021 अशी होती. परंतु, सध्या राज्यात अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी तसेच कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती व या वर्षी बारावीचा निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे विलंबाने मिळाली आहेत या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यापीठाकडून प्रवेशास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे बीए या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यात यावा व याअगोदर प्रवेशित असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेच्या निकालाची वाट न पाहता पुढील वर्गातील प्रवेश निश्चित करावेत तसेच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सहशिक्षक तथा सर्व पदवीधर यांनी शालेय व्यवस्थापन पदविका या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यात यावा असे आवाहन केज येथील डॉ.विश्वनाथराव कराड अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक प्रा.प्रविण कन्हेरे यांनी केले आहे. 


अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी केंद्रसहायक श्री अजय यादव यांच्याशी 9637530695 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.  असे आवाहन संस्थेचे सचिव व देवगावचे उपसरपंच अतुल मुंडे यांनी केले आहे.
close