shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चोरट्या दारू विक्रीवर केज पोलिसांची धाड..!!

 

-----------------------------------------------

प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधी  :- 

केज पोलिसांनी अवैद्य धंद्या विरुद्ध कार्यवाही करण्याचा सपाटा लावला असून एका धाब्यावर धाड टाकून देशी व विदेशी दारू विक्री करणारावर कार्यवाही केली.



दि. ४ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने येवता ते विडा जाणाऱ्या रोडवरील शिंदी फाट्यावरील जयहिंद हॉटेलवर सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान धाड टाकली. या वेळी बाबासाहेब गोरख सोनवणे हा त्याच्या फायद्यासाठी हॉटेलच्या पाठीमागे अवैद्यरित्या देशी व विदेशी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी बाबासाहेब सोनवणे याला ३३६० रु. किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. 


या कार्यवाहीत केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस हवालदार प्रभाकर नखाते आणि उमेश आघाव आघाव हे होते. तर पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादी वरून बाबासाहेब सोनवणे यांच्या विरुद्ध  गु.र.नं. ४३०/२०२१ दारूबंदी कायद्याचे कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

close