शिर्डी | दि. १६ प्रतिनिधी :
शिर्डी येथील पत्रकार तुषार महाजन यांची युवा वॉरियर्स शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आणि भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर सरचिटणीस आकाश आडांगळे यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती पत्रकार तुषार महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत आडांगळे, मयुर आडांगळे, किरण आडांगळे आदी उपस्थित होते.

