shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवेनाईक येथे शिवसेना शाखा उद्‌घाटन उत्साहात ... तरुणांनी सेनेत सक्रिय कार्य करावे - संदेश कार्ले

प्रविण जाधव यांची शाखा अध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधी : संजय वायकर

शिंगवे नाईक : दि . १७ / शिंगवे  नाईक तालुका नगर येथे ११ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या शाखा उदघाटनाचा कार्यक्रम संदेश कार्ले यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

 कार्यक्रमानिमित्त शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख  संदेश  कार्ले, शिवसेना नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवासेना नगर तालुका प्रमुख प्रवीण गोरे, देहरे गटाचे पंचायत समिती सदस्य व्हि,डी काळे, माजी सरपंच विश्वासराव जाधव, ग्रामपंचायत शिंगवे नाईकचे  विरोधी पक्षनेते  तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, तसेच  महेंद्र कोळपकर,मंगल निकम,  तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीश शेळके,इंद्रभान पुंड, राजेंद्र शेळके उपस्थित होते .

यावेळी उपजिल्हाप्रमुख कार्ले साहेब यांच्या हस्ते मा. प्रवीण जाधव यांना शिंगवे नाईक शाखा अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.तसेच  प्रवीण जाधव यांना पुढील कार्यासाठी  शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी शिवसेना कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदेश कार्ले यांनी सांगितले की शिवसंपर्क अभियान संपूर्ण जिल्हाभरात  राबविले जाणार आहे . सर्व तरुणांनी सेनेत सक्रिय कार्य करून गावच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करावेत असे सांगत शिवसैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले .

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .
close