shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्षण हा भाग्याचा आणि अभिमानाचा-शिवाजी गोंदकर

शिर्डी । प्रतिनिधी:-
आज देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस. माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस. आजच्या शुभदिनी श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर होऊन पदग्रहण सोहळा होणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शिर्डी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष म्हणून मी पदसिद्ध विश्वस्त होतोच पण इतर विश्वस्तांच्या नियुक्त्या न झाल्याने मला काम करण्याची संधी मिळाली नव्हती.

मात्र आता ही संधी मिळाली आणि तीही माझ्यासाठी कर्मयोगाचे प्रेरणास्थान असलेल्या मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी... अतिशय सुखद असा हा योगायोग आहे.

श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्तपद हे जबाबदारी आणि दायित्वाचे पद आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. मला या पदावर किती दिवस काम करायला मिळणार आहे याचा फारसा विचार न करता या पदाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. 

सर्वसामान्य साईभक्त केंद्रबिंदू मानून मी ही जबाबदारी निष्ठेने पार पाडील. श्री साईबाबांचा आशीर्वाद आणि आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच..!
 
शिवाजी अमृतराव गोंदकर
विश्वस्त श्री साईबाबा संस्थान
नगराध्यक्ष शिर्डी नगरपंचायत.
close