शिर्डी । प्रतिनिधी :-
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा आणि समर्पण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
शिर्डी मतदारसंघात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ रक्तदान शिबीर, वृक्षारोपण ,आणि रुग्णांना फळ वाटप करून करण्यात आले.
लोणी बुद्रुक आणि राहाता येथील ग्रामीण रुग्णालय तसेच शिर्डी येथील साईबाबा रुग्णालय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे आ.विखे पाटील यांनी रुग्णांना फळांचे वाटप करून रुग्णांशी संवाद साधला.
रुगणालयाच्या आवारात वृक्षारोपण केले.भाजयुमोच्या शिर्डी शाखेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला आ.विखे पाटील यांनी भेट दिली.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ,नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर ,कैलास कोते, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते,सुधिर शिंदे, मंगेश त्रिभुवन ,गफ्फारखान पठाण .अशोक गोंदकर ,सुजित गोंदकर ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा ,गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, व्हा चेअरमन प्रतापराव जगताप ,चेअरमन नंदूशेठ राठी ,रघूनाथ बोठे ,नितीन कापसे, अशोकराव पवार, भाजयुमोचे किरण बोराडे ,योगेश गोंदकर ,बिजेपी चे युवा जिल्हा सचिव सचिन शिंदे,जिल्हाभैय्या रासने,राजेंद्र हरिभाऊ गोंदकर ,लोणीच्या बुद्रुकच्या सरपंच सौ.कल्पना मैड ,उपसरपंच गणेश विखे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

