shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्राने लादलेले शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे रद्द करावेत - बिभीषण लोखंडे.बहुजन परिषद व प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार यांना निवेदन.

केंद्राने लादलेले शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे रद्द करावेत - बिभीषण लोखंडे.

बहुजन परिषद व प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार  यांना  निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी:(२७सप्टेंबर२०२१) बहुजन परिषद महाराष्ट्र व प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका यांच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध  करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अहिताचे केलेले कायदे रद्द करावेत व शेतकऱ्यांना या जुलमी कायद्यापासून मुक्तता मिळावी यासाठी दिल्लीच्या बॉर्डरवर साधारणपणे वर्षापासून शेतकरी बांधवांनी धरणे आंदोलन चालू केले आहे. त्यांचे मनोबल उंचवावे व केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी आज भारतभरातील प्रमुख विरोधी राजकीय पक्ष सामाजिक व राजकीय संघटनांनी एकत्रित भारत बंद चा आयोजन केलं होतं .त्याच पार्श्वभूमीवर बहुजन परिषद व प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार  यांना  निवेदन देण्यात आले.

 त्याप्रसंगी बहुजन परिषद व प्रहार च्या वतीने केंद्राने लादलेले शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे रद्द करावेत त्या प्रती आमच्या तीव्र भावना असल्याचे मत बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी व्यक्त केले.

 यावेळी बहुजन परिषदेचे सचिव विजय गायकवाड तालुका प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष संजय राऊत,  दत्तात्रय मिसाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 केंद्र सरकारने हे कायदे रद्द न केल्यास त्याविरुद्ध ज्या विरोधी पक्ष संघटना निर्णय घेतील त्या निर्णयाच्या समर्थनार्थ बहुजन परिषद व प्रहार जनशक्ती पक्ष एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी वाटेल ते त्याग करायला तयार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 
आमच्या भावना शासन दरबारी कळविण्यात यावे अशी विनंती तहसीलदार यांना उपस्थित निवेदन पत्र देणाऱ्यांनी  केली.
close