लढवय्ये स्वभावाचा वारसा असणारे.. सत्यशील पाटील वालचंदनगरचे सुपुत्र यांचा ४७ व्यां
अभिष्टचिंतनदीन पर विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: (२७ सप्टेंबर २०२१)सत्यशील पाटील यांना खंडकरी नेते बी. डी .पाटील यांचा लढवय्ये स्वभावाचा वारसा आहे.त्यांनी प्रथम २००५ मध्ये प्रथम वालचंदनगर वॉर्ड क्रमांक २ मधून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावून निवडणूक एक हाती जिंकले. ते २००५ ते २०१५ पर्यंत वालचंदनगर ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांच्या पत्नी मनीषा पाटील या ग्रामपंचायत सदस्य आहेत.त्यांनी नेहमी सामंजस्यची भूमिका घेत तरुण वर्गाला कायम पाठिंबा दिला व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मतदान कसे वाढेल याकडे लक्ष दिले.२०१५ मध्ये माजी सरपंच सौ छाया मोरे यांना सरपंच करण्यात मोलाची जवाबदारी पार पडली.त्यामुळे तब्बल वीस वर्षानंतर वालचंदनगर ग्रामपंचायत वरती हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराची सत्ता आली. हर्षवर्धन पाटील यांनी २०१६ पासून त्यांना इंदापूर अर्बन बँकचे संचालक केले.२०१९ विधानसभा मध्ये वालचंदनगर मधून विरोधकांचे लीड प्रथमच कमी झाले .२०२० ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शनखाली व सरपंच यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर वालचंदनगर ग्रामपंचायत वरती भाजपची एक हाती सत्ता पुन्हा आली. त्यांच्या या राजकीय व सामाजिक कार्याचा विचार करता तसेच अभ्यासू नेतृत्व असलेला चेहरा असल्याने त्यांना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील इंदापूर अर्बन बँकचे व्हाईस चेअरमन केले.
व्यवसायिक क्षेत्रामध्ये इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष २०११ पासून असून त्यांनी राजकारणा बरोबर केमिस्ट असोसिएशन मार्फत तालुक्यातील मेडिकल क्षेत्रातील सर्व केमिस्ट यांना संघटनात्मक बांधणी करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या प्रगतीला वाव कसा मिळेल याचाही प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे.
सत्यशील पाटील यांचा जन्म १९७४ साले दहीगाव या त्यांच्या मूळ गावी झाला असून त्यांचे वडील बी .डी. पाटील हे कळंब माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षक असल्याने त्यांनी वालचंदनगर या ठिकाणी वास्तव्यास होते. पुढे ते या ठिकाणीच राहिले. सत्यशील पाटील यांच्या प्राथमिक शिक्षण दहिगाव याठिकाणी दहावीपर्यंत झाले. त्यानंतर अकरावी ते बारावी नातेपुते या ठिकाणी झाले. कॉलेजचे शिक्षण कळंब या ठिकाणी तर बी फार्म चे शिक्षण माळेगाव कॉलेज या ठिकाणी झाले. त्यांनी स्वतःचा व्यवसाय मेडिकल क्षेत्र उभा केला असून त्यांचे राही मेडिकल व शिवेंद्र मेडिकल असे दोन औषधालय आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई रत्नप्रभादेवी व वडील बी. डी .पाटील हे त्यांचे सर्वस्व यशाचे मानकरी आहेत.
हे करीत असताना ते प्रगितशिल बागायतदार देखील आहेत.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आज अभिष्टचिंतन दिन आहे. यानिमित्त इंदापूर तालुक्यातील त्यांना मित्र परिवाराच्या वतीने विविध माध्यमातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
अभिष्टचिंतन दिनानिमित्त आज माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक कैलास कदम, अलिशान कन्ट्रक्शन चे, मुक्तार मुलानी,बबलू पठाण भारतीय जनता पार्टी चे इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रम मोरे व तालुक्यातील इतर मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

